खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील दहीवली शेलारवाडी येथे झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव व मदतकार्यात आणखी एक दिलासादायक घटना समोर आली. दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या साहित्याची पाहणी करताना कल्पना शेलार यांचे सुमारे २ तोळ्यांचे मंगळसूत्र तसेच १२ हजारांची रोख रक्कम सुरक्षित अवस्थेत मिळून आली. मिळालेले मंगळसूत्र व रोख रक्कम संबंधित कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली. आपत्तीच्या कठीण प्रसंगातही मदतकार्यात सहभागी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच्या भावनेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, संदीप धाडवे, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, श्रीराम कदम, प्रदीप चव्हाण, बळीराम निकम, आबा चाळके, राजेंद्र शेलार, रूपेश कदम, रॉबीन भोसले, भरत महाडिक, रघुनाथ कदम, परेश जाधव, पंकज वाडकर, समीर राणीम, अजय बेलोसे उपस्थित होते. संकटाच्या काळात मदतकार्याबरोबरच नागरिकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे शोधून त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे कार्यही तितक्याच जबाबदारीने पार पडत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.