loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसांत घेणार, मंत्री भरत गोगावले यांचे मोठे वक्तव्य

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय चर्चाना आणि वादाला अखेर पूर्णविराम मिळाला असल्याचे संकेत मिळत आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली असून, आमचा हा प्रश्न आता मार्गीलागला आहे. खासदार तटकरेंसोबतचा वाद मिटल्याचा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंत्री भरत गोगावले पूढे म्हणाले, आम्ही त्यांच्या मुलाला (अनिकेत तटकरे) बिनविरोध सीट दिली आहे, त्यामुळे आमचे पालकमंत्री पदही त्यांनी बिनविरोध ठरवले आमच्यातील सर्व वाद आणि विरोध आता संपला आहे, असा दावा गोगावले यांनी केला. परवा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासित केले असून, येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्री पदाचा अधिकृत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहिर करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg