loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील ज्येष्ठ उद्योजक अनंत साळवी यांचे निधन

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील ज्येष्ठ उद्योजक, समाजसेवक आणि साळवी इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा अनंत शंकर साळवी यांचे बुधवार 15 जुलै रोजी आकस्मिक दु:खद निधन झाले असून लांजा शहराने एक यशस्वी उद्योजक गमावल्याचे दु:ख व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनंत साळवी यांनी आपल्या कष्टाच्या बळावर लांज्यात वेल्डिंग व्यवसाय सुरू केला. त्या काळात कमी खर्चात आणि दर्जेदार कामाची सुविधा उपलब्ध करून देत व्यवसायात नावलौकीक मिळविला. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये ते सक्रियपणे कार्यरत होते. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि परोपकारी वृत्तीमुळे सर्वामध्ये लोकप्रिय होते. सर्वाशी ते सौहार्दपूर्ण वागत असत, अशा या उदारमतवादी असलेल्या व्यक्तिच्या निधनाबद्दल लांजा पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवर आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg