loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात तीन आरएमसी वाहनांवर हल्ला, जय भारत कंपनीच्या वाहनांची तोडफोड

बांदा (प्रतिनिधी) - बांदा-दाणोली रस्त्याचे काम करणाऱ्या जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ताब्यातील तीन सिमेंट काँक्रीट (आरएमसी) मिक्सर वाहनांची अज्ञातांनी मध्यरात्री तोडफोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वाफोली जंगल परिसरातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांटमध्ये उभी असलेल्या या तीन वाहनांचे नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच परिसरात यापूर्वीही वाफोली येथील खाण परिसरात उभ्या असलेल्या फोकलँड (एक्स्कॅव्हेटर) मशीनला अज्ञातांकडून आग लावण्यात आली होती. मात्र, त्या घटनेतील संबंधितांचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रस्ता प्रकल्पावरील यंत्रसामग्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे रस्ता प्रकल्पाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनांमागील संबंधितांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg