loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण आणि कुंभारमाठ गावचे पोलीस पाटील विठ्ठल बावकर यांचे अकाली निधन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण आणि कुंभारमाठ गावचे पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तथा बबन एकनाथ बावकर वय ५६ यांचे रविवारी दुपारी 12.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. बावकर यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गावचे रहिवासी विठ्ठल एकनाथ बावकर हे गेली पंधरा वर्षे कुंभारमाठ गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. तर अलीकडच्या काळात मालवण गावचे पोलीस पाटील म्हणूनही ते काम पाहत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभारमाठ शाळेत झाल्यानंतर मालवणच्या भंडारी हायस्कुलमध्ये त्यांचे बारावी पर्यंत शिक्षण झाले. लोकांच्या अडीअडचणीच्या काळात मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असत.

टाईम्स स्पेशल

दांडगा मित्रपरिवार असणाऱ्या आणि सामाजिक कार्याची आवड असणारे विठ्ठल बावकर हे रिक्षा व्यावसायिकही होते. त्याशिवाय कुंभारमाठ येथे त्यांचे निखिल जनरल स्टोअर नावाचे दुकानही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नात, भाऊ, वहिनी, दोन बहिणी, भावोजी, भाचे असा परिवार आहे. सोमवार ६ जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता कुंभारमाठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg