खेड (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वर्ष २०२६-२७ या कार्यकाळासाठी निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा भरणे-जोगळे येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात नूतन अध्यक्ष म्हणून लायन अविनाश अनिता अनंत दळवी, सचिव म्हणून लायन उत्तम कांबळे आणि खजिनदार म्हणून लायन संदीप मोरे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर उपस्थित होते. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम अधिक जोमाने राबवावेत, अशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, नगराध्यक्षा माधवी बुटाला, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजप अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याचे इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून एमजेएफ लायन पराग पानवलकर यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच माजी प्रांतपाल व मल्टिपल कौन्सिल सेक्रेटरी-ट्रेझरर एमजेएफ लायन डॉ. विरेंद्र चिखले, झोन चेअरमन लायन निलेश हेदुकर, नॅशनल हेअर अँड ब्युटी अकॅडमी, मुंबईचे चेअरमन तुषार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी लायन ओम जाधव, माजी अध्यक्ष लायन महेंद्र शिरगावकर, रोहन विचारे, लायन माणिक लोहार, लायन परेश चिखले, सुरेश चिकणे, मिलिंद तलाठी, डॉ. वेद तलाठी, ज्ञानेश्वर मुरकर, स्वप्निल नरळकर, भाजप सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीच्या आगामी वर्षातील सेवा उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. समाजहित, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंना मदत या क्षेत्रात अधिक व्यापक काम करण्याचा संकल्प नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनीही लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.