loader
Breaking News
Breaking News
Foto

​दापोली तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, ग्रामीण भागातील वीज पुरवठा विस्कळीत

दापोली (सागर गोवळे) - दापोली तालुक्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी, वादळी वाऱ्यांनी थैमान घातले आहे. या वारंवार येणाऱ्या वादळांमुळे दापोलीच्या ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ​विशेषतः दाभोळ, पंचनदी आणि आडी-बोरिवली परिसरात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून, महावितरणच्या कर्मचाऱ्यांपुढे दुरुस्तीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg