loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड-दापोली मार्गावर एसटी घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली

संगलट (खेड), (इक्बाल जमादार) - महाड-दापोली राज्य मार्गावर पावसाळा सुरू होताच वाहन घसरण्याच्या घटनांना पुन्हा सुरुवात झाली आहे. कुरले गावाजवळ फौजी अंबवडे—मुंबई एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरल्याने अपघात झाला. सुदैवाने बसमधील पाचही प्रवासी आणि चालक-वाहक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मागील वर्षी शिरगाव ते आंग्रे कोंड दरम्यान पावसाळ्यात वाहन घसरण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. यंदाही पावसाळ्याला सुरुवात होताच त्याच प्रकारच्या अपघातांची मालिका सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या राज्य मार्गाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई सेंट्रल आगाराची फौजी अंबवडे—मुंबई एसटी बस महाडच्या दिशेने येत असताना दुपारी सुमारे तीन वाजता कुरले गावाजवळ रस्त्यावरील साईड पट्टीवर घसरून रस्त्याच्या बाजूला गेली. बसमध्ये पाच प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे महाड-दापोली राज्य मार्गाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg