loader
Breaking News
Breaking News
Foto

पुरग्रस्तांना तातडीने मदत द्या - खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे शासनास निवेदन

खेड - याच आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील शेतकरी, गोरगरीब आणि शहरातील व्यापारी तसेच नागरीकांचे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीची मदत द्यावी याकरीता खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे तहसिलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी नदीतील गाळ उपसासाठी कोट्यावधीचा खर्च करूनही खेड शहरातील बाजारपेठ आणि वसतीक्षेत्र सदैव पाण्याखालीच येत असल्याने कोट्यावधीच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच काँग्रेसच्या गौस खतीब यांनी या गाळ उपसाच्या कोट्यावधी खर्चामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले. सदर विषयाची चौकशी लावण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे गौस खतीब म्हणाले. यावेळी ठाकरे सेनेच्या तालुका संघटक अंकिता बेलोसे, उपशहरप्रमुख राजन निर्मळ, माजी नगरसेवक बशीर मुजावर, जसनाईक, बाबाराम विटमल, संदिप चव्हाण आणि आघाडीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg