loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिवली दरडग्रस्तांच्या मदतीला रोटरी क्लब ऑफ लोटे; वर्षभर सामाजिक आणि पुनर्वसन उपक्रम राबविणार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी भागात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर बाधित कुटुंबांच्या मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ लोटे पुढे सरसावला आहे. रोटरी क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दरडग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करत जखमी आणि स्थलांतरित नागरिकांची विचारपूसही केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रोटरी क्लबने संपूर्ण दरडग्रस्त भागाची पाहणी करून पुढील एक वर्ष दहिवली परिसरात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प जाहीर केला. तसेच नुकसानग्रस्त घरांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही दिली.

टाईम्स स्पेशल

या मदत उपक्रमात रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षा रोटेरियन सोनाली रहाटे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रावणी सुर्वे, रोटेरियन संदीप सुर्वे, रोटेरियन उत्तमकुमार जैन, रोटेरियन संकेत चाळके, रोटेरियन शिरीष चौधरी, रोटेरियन तुषार दिवेकर, रोटेरियन मनीष वाडकर, रोटेरियन मिहिर वारणकर, रोटेरियन राजू ठसाळ, रोटेरियन ठाकरे सर तसेच स्वयंसेवक शाम शिर्के आणि उमेश भोसले उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg