loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे रस्त्यावर झाड कोसळले, काही काळ वाहतूक ठप्प

वैभववाडी - तालुक्यात सोमवारी झालेल्या जोरदार वादळवार्‍याने उबर्डे वैभववाडी मार्गावर झाड कोसळून सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. तर वैभववाडी नावळे महामार्गावर नगरपंचायतीच्या हद्दीत झाड पडून अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच कुंभवडे येथे एक घर कोसळून मोठे नुकसान झाले. तर वाभवे येथे एका घरावर झाड पडल्याने नुकसान झाले, सुदैवाने या दोन्ही नुकसानीमध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यात ८० मीमी पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत करूळ आणि भुईबावडा घाट दोन्ही वाहतूक सुरळीत सुरू होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवार दुपारी तालुक्याला जोरदार वादळवार्‍याने झोडपून काढले. या वादळी वार्‍याने दुपारी तीनच्या सुमारास वैभववाडी उंबर्डे मार्गावर झाड कोसळल्याने व वैभववाडी नावळे महामार्गावर झाड पडल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. झाड वीज वाहिनीच्या लाईन वर पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वाहनचालक व ग्रामस्थांनी झाड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर उर्वरित झाड संबंधीत यंत्रणेने तात्काळ हटवून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान वीज वितरण कंपनीकडून वीज खांब उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

टाईम्स स्पेशल

माहिती मिळतात तहसीलदार सूर्यकांत पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनय जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली. कुंभवडे येथे हरिचंद्र राव यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळून मोठे नुकसान झाले. तसेच वाभवे येथे उमेश आनंद गावडे यांच्या घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाले. काही दिवसापासून वैभववाडी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. वीजेच्या सततच्या लपंडावामुळे नागरिक आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg