दापोली (प्रतिनिधी) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. अतुल मोहोड यांची सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्था कपुस्तला पंजाब येथे महासंचालक म्हणून तीन वर्षाकरीता निवड झाली आहे. अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या एका कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञाची महासंचालकपदी निवड झाल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. डॉ. अतुल मोहोड यांच्या झालेल्या निवडीबाबत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्था ही संस्था भारत सरकार ऊर्जा मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असणारी एक नामांकित संस्था असून या संस्थेमध्ये देशपातळीवर जैव इंधनासंबधित संशोधन, शिक्षण आणि विस्तार तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तनावरील जैव ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबर सामंजस्य कराराच्या माध्यमातून काम करते. या संस्थेच्या महासंचालकपदी विद्यापीठातील एका शास्त्रज्ञाची निवड झाल्याबद्दल विद्यापीठामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. डॉ. अतुल मोहोड हे या विद्यापीठामध्ये गेली पंचवीस वर्षे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक विभागप्रमुख ते सहयोगी अधिष्ठाता अशा विविध पदाचा त्यांना संशोधनाचा आणि प्रशासनाचा अनुभव आहे.
तसेच त्यांनी विद्यापीठ अभियंता म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या सहकायनि दापोली येथे उभारण्यात आलेले एनर्जी पार्क, गॅसीफायर कोकणातील शेतमालापासून तयार होणारा काडी कचरा आणि जंगली झाडाझुडपांपासून जैविक कोळसा तयार करणे आणि अपारंपारिक ऊर्जेच्या स्रोतापासून विविध प्रकारची वाळवणी यंत्रे इत्यादीच्या संशोधनामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.