loader
Breaking News
Breaking News
Foto

तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांना अखेरचा मानाचा सलाम

रत्नागिरी (राजन बोडेकर) - कोकणातील लोककला असलेल्या शक्ती-तुर्‍याला सुवर्णकाळ प्राप्त करून देणार्‍या दिग्गज शाहीरांमध्ये रामचंद्र घाणेकर यांचे नाव सदैव अग्रस्थानी राहील. त्यांच्या कलेला कोकणातील शाहीर आणि चाहत्यांनी नेहमीच पसंत केले. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शाहीर रामचंद्र घाणेकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या दमदार आवाजाने, आशयघन गीतांनी आणि पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणार्‍या नावीन्यपूर्ण प्रयोगांनी शक्ती-तुरा अधिक समृद्ध केला. त्यांच्या असंख्य रचना आजही रसिकांच्या मनात तितक्याच जिवंत आहेत. त्यातलीच श्रावण बाळ जातो काशीला ही अजरामर एक रचना तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशीच रचना आहे. रंगमंचावरील हा बादशहा आज आपल्या सोबत नसला, तरी त्यांनी जपलेला सांस्कृतिक वारसा सदैव अजरामर राहील. शक्ती-तुर्‍यातील एक तेजस्वी तारा आज निखळला आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, असे म्हटले जातेय.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg