loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत सद्गुरु मियासाबांचा ८१वा पुण्यतिथी उत्सव उत्साहात

सावंतवाडी : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक परमपूज्य श्री सद्गुरु मियासाब यांचा 81 वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने संपन्न झाला. जिल्ह्यासह गोव्यातील भाविक देखील पुण्यतिथी निमित्त दर्ग्यावर डोक टेकण्यासाठी, समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी उपस्थित होते. सद्गुरु मियासाब यांचा ८१ वा पुण्यतिथी निमित्त सकाळपासून सद्गुरू पूजन, नामस्मरण, किर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, भक्तांनी उपस्थित राहत दर्शन घेतले. यावेळी प. पू. सद्गुरू मि्यांसाब भक्त मंडळाचे अध्यक्ष वसंत राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, सरचिटणीस दत्तप्रसाद अरविंददेकर, खजिनदार शैलेश पै, सहचिटणीस उमेश कोरगावकर, सदस्य सुभाष स्वार, ऋतुराज शिर्के, सदानंद पडते, साईप्रसाद हवालदार, वैभव उर्फ बंटी माठेकर, सुनील सावंत, मनोहर मसुरकर, रघुनाथ कोरगावकर, चंद्रशेखर गिरप यांसह शेकडो परमपूज्य सद्गुरु मियांसाब भक्त मंडळी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg