loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली शाळा नं.१ ला आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने सन्मानचिन्ह व सन्मानपत्राची भव्य मिरवणूक व शाळेचा कौतुक सोहळा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ ला सन २०२५/२६ चा आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने या पुरस्कारामध्ये प्राप्त झालेले सन्मानचिन्ह व सन्मानपत्र याची संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच शाळेचा कौतुक सोहळा शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. वरवेली गावातील ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून पुरस्कार मिळाल्याबद्दलचा आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये वरवेली येथील श्री हसलाई देवी मंदिर, तेलेवाडीतील श्री काशीविश्वेश्वर मंदिर, रांजाणे वाडीतील श्री वरदानीदेवी मंदिर, श्री दत्त मंदिर, राजहंस सभागृह, लोहारवाडी, बौद्धवाडी येथील परिवेण बुद्ध विहार, मधली शिंदेवाडी, वरवेली खालचीवाडी येथील श्री हसलाई देवी मंदिर, आगरेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे या गौरव यात्रेचे ग्रामस्थानी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक तसेच शिक्षक, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य गौरव मिरवणूक काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गौरव यात्रेमध्ये वरवेली ग्रामपंचायतचे सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य अरुण रावणंग, नरेश रांजाणे, पत्रकार गणेश किर्वे, निवृत्त शिक्षक राजेंद्र विचारे गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेश विचारे, शिक्षणतज्ञ जितेंद्र विचारे, दिलीप विचारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांजाणे, बळीराम पवार, गणेश रांजाणे, संदीप रांजाणे, अविनाश रांजाणे, जितेंद्र झगडे, अशोक रावणंग, वैभव पवार, मनस्वी किर्वे, नरेश करंदेकर, दत्ताराम आगरे, रसिका रांजाणे, आशिकी चांदोरकर, स्नेहल रांजाणे, प्रेरणा रांजाणे, अंकिता किर्वे, दिपाली पवार, शाळा नं.२ चे मुख्याध्यापक मनोज नाखरे, शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर, शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे, अर्चना वाकडे, आशा सेविका दिव्या किर्वे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, करुणा भोसले, सानिका रांजाणे, अस्मिता पवार व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

गौरव यात्रेची सांगता कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये वरवेली गावाच्या वतीने आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कारासाठी मेहनत घेणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg