loader
Breaking News
Breaking News
Foto

कामगारनेते आमदार सचिन अहिर यांचा परळच्या महात्मा गांधी सभाग्रहात १४ जुलै ‌रोजी भव्य जाहीर सत्कार

मुंबई : कामगारनेते सचिन अहिर यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदी‌ अभिनंदनीय निवड झाली आहे. हा योग कामगार चळवळीसाठी भूषणवाह मानला जात असून कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र इंटक, राष्ट्रीय मिल मजूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने कामगारनेते आमदार सचिन अहिर यांचा येत्या मंगळवार दि.१४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता परळच्या महात्मा गांधी सभागृहात ऋद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गिरणी कामगारांच्या खास आग्रहास्थव हा भव्य सत्कार सोहळा पार पडत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले आहेत. तेव्हा येत्या १४ जुलै रोजीच्या सत्कार सोहळ्यात कामगारांच्या मोठ्या उपस्थितीने सहभागी होण्याचा निर्णय नुकताच राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये पार पडलेल्या १६ कामगार संघटनांच्या‌, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र इंटक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही हा सत्कार सोहळा कामगारांच्या मोठ्या उपस्थितीने संपन्न करण्याचा निर्धार केला आहे.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते ‌यांच्या अध्यक्षतेखाली वरील सर्व सभा पार पडल्या असून अध्यक्ष सचिन‌ अहिर यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांवर दिलेले लढे यशस्वी ठरले आहेत. तसेच त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य बहूआयामी ठरले आहे. सचिन अहिर यांच्या १४ तारखेच्या जाहीर सत्कार समारंभात त्यांच्या या कार्याचा गुणगौरव होईल! संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आणि संघटन सेक्रेटरी हा जाहीर सत्कार सोहळा यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg