loader
Breaking News
Breaking News
Foto

बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीत खोदकाम सुरू, पाण्याखालचा पहिला बोगदा साकारतोय

मुंबई, : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता जबरदस्त वेग मिळाला असून, देशातील पहिल्या खाडीखालच्या रेल्वे बोगद्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये एका भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने हे खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील बोगद्यात रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. बुलेट ट्रेनसाठी आता दुसरे ’टीबीएम’ दाखल झाले असून, त्याच्या मदतीने खाडीखालून तब्बल ७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. दुसर्‍या टीबीएमचा वापर करून नवी मुंबईतील घणसोली (सावली) येथून विक्रोळीपर्यंत बोगदा तयार करण्यात येत आहे. हा संपूर्ण बोगदा १० किलोमीटर लांबीचा असून, यापैकी ७ किलोमीटरचा मार्ग थेट ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये एकूण २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचा समावेश आहे. यापैकी १६ किमी लांब मार्ग सावली ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत असेल. पहिल्या टीबीएमने ५ जुलैपासूनच विक्रोळी ते बीकेसीपर्यंत ६ किमी लांबीच्या मार्गाचे खोदकाम सुरू केले आहे. उर्वरित ५ किमी लांबीच्या मार्गाचे काम यापूर्वीच ’न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण झाले आहे. मुंबई ते अहमदाबाद संपूर्ण बुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गावर महाराष्ट्रात मुंबई (बीकेसी), ठाणे, विरार आणि बोईसर अशी चार स्थानके असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पार करता येणार आहे. या ५०८ किमीच्या मार्गावर एकूण ८ डोंगरी बोगदे आहेत (७ महाराष्ट्रातील पालघरमध्ये, तर १ गुजरातमधील वलसाडमध्ये). याशिवाय या कॉरिडॉरवर २८ स्टीलचे पूल आणि २५ नदीवरील पुलांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

सध्या खोदकामासाठी वापरण्यात येणारे ’टीबीएम’ हे देशातील सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आहे. या मशीनचे कटरहेड तब्बल १३.६ मीटरचे असून, त्याची उंची एका ४ मजली इमारतीइतकी आहे. या एका मशीनचे वजन जवळपास ५०० हत्तींच्या वजनाएवढे असून, त्याची लांबी एका फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढी (९६ मीटर) आहे. घणसोलीतील सावली येथे हे मशीन खाली उतरवून त्यानंतर शाफ्टमध्ये त्याचे वेगवेगळे भाग जोडण्यात आले. या मशीनद्वारे मुंबईतील रहिवासी भागाखालून वाहतुकीला कोणताही अडथळा न येता रेल्वे मार्ग तयार करणे शक्य होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg