loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रुप ग्रामपंचायत असुर्डेचा बेजबाबदार कारभार; १५दिवसांपासून मनवेवाडीसह चार वाड्यांतील शेकडो कुटुंबांची पाण्यासाठी वणवण

मकरंद सुर्वे संमेश्वर :प ग्रामपंचायत मौजे असुर्डेच्या बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे मनवेवाडी प्रभागातील शेकडो ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. ५ जुलै २०२६ पासून मनवेवाडी, गुरववाडी, पातडेवाडी तसेच कुल्येवाडी-लोहारवाडी येथील सुमारे दोनशेहून अधिक कुटुंबांचा नळपाणी पुरवठा पूर्णपणे बंद असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दररोज वणवण भटकावे लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची होत असलेली फरफट पाहूनही ग्रामपंचायत प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.ग्रामपंचायतीकडून "दोन्ही पंप नादुरुस्त झाले आहेत" असे कारण पुढे केले जात आहे. मात्र, एकाच वेळी दोन्ही पंप बंद पडणे ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब नसून निष्काळजीपणा आणि देखभालीच्या अभावाचे जिवंत उदाहरण असल्याचे ग्रामस्थ मंगेश पाताडे यांचे म्हणणे आहे. मुख्य पंप बंद पडल्यास तातडीने वापरता यावा म्हणून पर्यायी पंप खरेदी करण्यात आला होता. मग तोही वापरण्यायोग्य का नव्हता? लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या यंत्रणेची देखभाल नेमकी कोणी केली, असा संतप्त सवाल मंगेश पाताडेसह नागरिक उपस्थित करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याहून गंभीर बाब म्हणजे, सलग पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा करणारी पर्यायी व्यवस्था तसेच वेळीच पंप दुरुरतीची तसदी न घेतल्याने नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करण्याची वेळ आली असून ऐन शेती हंगामात शेतीची कामे बाजूला ठेऊन महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात भटकत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही या संकटाचा सर्वाधिक फटका बसत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांची होत असलेली ही फरफट ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक चित्र असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.दरम्यान, गावातील जलजीवन मिशनची कामेही अद्याप अपूर्ण असून नैसर्गिक जलस्रोतांवर परिणाम झाल्याने संपूर्ण गाव नळपाणी योजनेवर अवलंबून आहे. मात्र योजना बंद पडल्यावर पर्यायी व्यवस्था नसणे हे संबंधित यंत्रणेच्या अपयशावर शिक्कामोर्तब करणारे असल्याचे बोलले जात आहे.

टाइम्स स्पेशल

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनावर कठोर कारवाई करावी, नादुरुस्त पंप तातडीने कार्यान्वित करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मांगणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg