loader
Breaking News
Breaking News
Foto

गुटखा कारवाईतील आरोपी फारुक कच्चीला चार दिवसांची पोलीस कोठडी, दुसरा आरोपी मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण याचा शोध सुरू

मकरंद सुर्वे /संगमेश्वर :संगमेश्वर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री प्रकरणात अटक केलेल्या फारुक अल्लारखॉ कच्ची याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आज (सोमवारी) पुढील सुनावणी साठी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या फारुक कच्ची याला संगमेश्वर पोलिसांनी ९ जुलै रोजी चिपळूण येथे सापळा रचून अटक केली होती. या अटकेमुळे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणात २६ जून २०२६ रोजी रात्री पारेख पेट्रोल पंपाजवळ (एमएच-१४/बीके-४१२०) क्रमांकाच्या वॅगनार कारमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने कार रस्त्याच्या कडेला लॉक करून घटनास्थळावरून पलायन केले होते.यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता सुमारे ₹५ लाख ४६ हजार ६०० किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

तपासा दरम्यान जप्त वाहनाचा मालक फारुक अल्लारखॉ कच्ची आणि मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण हे संगनमताने प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते.गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी चिपळूण येथे कारवाई करून फारुक कच्ची याला अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण याचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या देखरेखीखाली पोहेकॉ मनवल आणि पोलीस कॉन्स्टेबल आटोळे यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg