loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरसेवक रफिक नेवरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळे वाटप

केळंबे-लांजा : (सिराज नेवरेकर) लांजा येथील नगरसेवक रफिक नेवरेकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप केले. वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक बांधिलकी जपत हा सेवाभावी उपक्रम रफिक नेवरेकर यांनी राबविला. रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांना फळांचा आहार मिळावा आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता व्यक्त करावी या मुख्य उद्देशातून या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने लांजा ग्रामीण रुग्णालयात गरजू आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांना रफिक नेवरेकर यांनी फळांचे वाटप केले. दरम्यान, यावेळी रुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये जाऊन रफिक नेवरेकर यांनी रुग्णांची चौकशी केली. तर या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg