वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर या विद्यालयाने भात लावणी प्रात्यक्षिक कार्य क्षेत्रभेट आयोजित केली. त्यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, गुहागरचे केंद्र प्रमुख डॉ. मनोज पाटील, माजी मुख्याध्यापक व लायन्स क्लब गुहागरचे सेक्रेटरी ला. सुधाकर कांबळे, प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर ,पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर, ज्येष्ठ शिक्षक संतोष मोहिते, अविनाश गमरे, नाईक, माने व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय प्राचीन संस्कृती व कृषी संस्कृती, उद्योजकता या विषयांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांना प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर यांच्या शेतीमध्ये प्रत्यक्ष भात लावणीचा अनोखा अनुभव देण्यात आला. शेतकऱ्यांचे जीवनमान त्यांना प्रत्यक्ष पाहता आले. आपला समृद्ध प्राचीन वारसा व कृषी संस्कृतीचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशा क्षेत्रभेटी सारख्या अध्ययन अनुभवाची योजना केल्याने, निसर्गाच्या मुक्त वातावरणामध्ये व्यावसायिक कुशलतेचा संपन्न असा नाविन्यपूर्ण निखळ अविस्मरणीय आनंद विद्यार्थ्यांना अनुभवता आला. शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांना भाताच्या विविध संकरित जाती, शेतीची मशागत कशी करावी, पेरणी, लावणी, कापणी, मळणी यासह बाजारपेठा याबाबत सर्व माहिती सांगितली.
पारंपारिक शेती ते आधुनिक यांत्रिकीकरण यासंबंधी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत स्वतः लावणी केली. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख डॉ.मनोज पाटील म्हणाले की, भारतामध्ये पूर्वी बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. शेती उद्योगावर आधारित उद्योगधंदे शेतात राष्ट्राच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. धरतीच्या उदरामध्ये मातीमध्ये सोने लपले आहे, फक्त कष्ट करण्याची आवश्यकता आहे. गांधीजींच्या खेड्याकडे चला या संदेशाची त्यांनी आठवण करून दिली. मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांनी क्षेत्रभेट यशस्वी केल्याबद्दल सर्व शिक्षकांना व उपस्थित सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिते यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.