loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खेड : येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, खेड या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. यामध्ये इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुष्का नवनीत घडशी (जिल्ह्यात २६ वी), अनम नबिल मुकादम (जिल्ह्यात २८ वी), समृद्धी जनार्दन जाधव (जिल्ह्यात ६७ वी), विघ्नेश नवनीत घडशी (जिल्ह्यात १०५ वा) तसेच इयत्ता आठवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रसाद रतिश धामणकर (जिल्हयात ५९ वा), अब्दुल रहमान रियाझ अहमद महाडिक (जिल्ह्यात ८८वा), मिर्झा अब्दुल्ला मिर्झा रियाझ बेग (जिल्ह्यात ९७ वा) यांनी सुयश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेणे, विलीन पाटणे, माजीद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयक एल्सी जॉय, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. यशाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहा.शिक्षक जयवंत सावंत, रूपाली कांचनकोटी, सारिका निवळकर, तेजल बैकर, कादिरी, जाधव आर.आर, गौरी पाटणे, पूजा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशवंत विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg