loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै ला दापोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी दापोलीच्या वतीने " महारक्तदान संकल्प २०२६" या नावाने रक्तदान शिबिराचा महत्वाचा आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते अशा या रक्तदान शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दापोली तालुका भाजपाने बुधवारी २२ जुलै रोजी आयोजित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रक्तदान शिबिराला सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. तरी जन सेवेच्या या पवित्र उपक्रमाला आपल्या सहभागाचे बळ देऊन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन दापोली तालूका भारतीय जनता पार्टी तर्फे सर्वांना करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg