loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गात गोवा बनावटीच्या अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग पोलिसांनी अवैध गोवा बनावटीच्या दारूविक्री विरोधात विशेष मोहीम राबवत काल रात्री दोन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ११,७३० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत कुडासे तिठा, ता. दोडामार्ग येथे प्रवीण लक्ष्मण धरणे (वय ४१, रा. गावठाणवाडी, साटेली भेडशी) याच्याकडून ५,१०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी उर्मिला रमेश सातार्डेकर (मपोकॉ/६६७), दोडामार्ग पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ वसंत देसाई (ब.क्र. ७११) करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसऱ्या कारवाईत साटेली परमे रोडवरील एका घराच्या पाठीमागील आडोशात शुभम देवेंद्र धरणे (वय २५, रा. खैराटवाडी, साटेली भेडशी) याच्याकडून ६,६३० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय सुरेश जाधव (ब.क्र. १२८३) यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोहेकॉ अंकुश नाईक (ब.क्र. ४८८) करीत आहेत. या दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. कारवाईत पोलीस हवालदार वसंत देसाई, विठोबा सावंत, अंकुश नाईक, उमेश देसाई, महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला सातार्डेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव तसेच चालक पोलीस हवालदार अनिल कांबळे यांनी सहभाग घेतला. दोडामार्ग तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेली कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg