loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिला होणार उद्योजक; ’कृषी संगिनी’ समूहाकडून प्रेरणादायी मार्गदर्शन

दापोली(सागर गोवळे)- ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्‌या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेची नवी दिशा देण्यासाठी ’कृषी संगिनी’ समूह सरसावला आहे. रावे कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाने गावातील विविध स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिलांसाठी एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. या उपक्रमाद्वारे महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मार्गदर्शनादरम्यान महिलांना शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, आर्थिक नियोजनाचे महत्त्व आणि कमीत कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय कसा उभारता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक स्तरावर उपलब्ध असणार्‍या संसाधनांचा वापर करून मूल्यवर्धित कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योग आणि पूरक व्यवसाय सुरू करण्यावर भर देण्यात आला. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी केवळ उत्पादन महत्त्वाचे नसून, उत्पादनाची गुणवत्ता, त्याचे योग्य नियोजन आणि प्रभावी विपणन (मार्केटिंग) किती आवश्यक आहे, हे कृषी संगिनींच्या वतीने पटवून देण्यात आले. या सत्रात बचत गटांच्या माध्यमातून महिला कशा प्रकारे आर्थिक स्वावलंबन गाठू शकतात, याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

कृषी संगिनींच्या या उपक्रमशील मार्गदर्शनामुळे गावातील महिलांमध्ये उद्योजकतेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण आणि सहकार्य मिळावे, अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात कृषी संगिनी समूहातील वैभवी देसाई, सलोनी माने, मृदुला मुळे, आर्या निकम, आर्या पाटील, तेजस्विनी पाटील, अपूर्वा साबळे, अर्पिता राज, रितू सिनवार व कर्मा सोलंकी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत महिलांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg