loader
Breaking News
Breaking News
Foto

कसबा पोस्ट ऑफिसच्या स्थलांतर सोहळ्याचे आयोजन; ग्रामपंचायत इमारतीतून नव्या कार्यालयाचा शुभारंभ

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : कसबा येथील पोस्ट कार्यालयाच्या नव्या ठिकाणी स्थलांतराचा शुभारंभ सोहळा शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कसबा ग्रामपंचायत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर, बँक ऑफ इंडिया शेजारी नव्याने स्थलांतरित झालेल्या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे शुभहस्ते रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून, त्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला कसबा ग्रामपंचायतीच्या प्रशासक (सरपंच) कु. पूजा लाणे, कसब्यातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष सरदेसाई तसेच पंचायत समिती सदस्य सुजित महाडिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नवीन ठिकाणी पोस्ट कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांना अधिक प्रशस्त व सोयीस्कर वातावरणात टपाल सेवा उपलब्ध होणार आहे. विविध टपाल, बचत योजना, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा तसेच इतर पोस्टल सुविधा आता ग्रामपंचायत इमारतीतून उपलब्ध होतील. त्यामुळे कसबा परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. या स्थलांतर सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कसबा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर व सर्व कर्मचारी वर्ग यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg