loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडलोस केणीवाड्यात चार फुटी इंडियन कोब्राला जीवनदान

बांदा(प्रतिनिधी)- पाडलोस येथील केणीवाडा परिसरात नारायण सातार्डेकर यांच्या घरातील लाकडाच्या ढिगार्‍यात साडेतीन ते चार फुटांचा इंडियन कोब्रा आढळून आल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखत सर्पाला इजा न करता तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महेश कुबल यांना माहिती दिली. कुबल यांनी तत्काळ पेडणे-खाजणे येथील सर्पमित्र सुजित देऊ कोरगावकर यांच्याशी संपर्क साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळी पोहोचलेल्या कोरगावकर यांनी अत्यंत शिताफीने व सुरक्षितरीत्या नागाला पकडले. त्यानंतर वन्यजीव संवर्धनाचा संदेश देत त्या सर्पाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. हा साप इंडियन कोब्रा जातीचा असून त्याची लांबी सुमारे साडेतीन ते चार फूट असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. तसेच, पाडलोस गावात आजपर्यंत विविध जातींचे सहा साप सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्याबद्दल ग्रामस्थांनी सर्पमित्राचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg