loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे स्कॉर्पिओ पलटी; मोठ्या प्रमाणावर मांस वाहतूक उघड, सावंतवाडी पोलिसांत आरोपी ताब्यात

सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने ही गाडी महामार्गावरच पलटी झाली. मात्र, या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पलटी झालेल्या या गाडीतून मोठ्या प्रमाणावर मांसाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. हे मांस गोमांस किंवा वन्य प्राण्यांचे असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, सदर स्कॉर्पिओ गाडी मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना नेमळे गावच्या हद्दीत आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरच उलटली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, गाडीची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात मांस गोण्यांमध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. हे मांस गोमांस किंवा कोणत्याही वन्य जिवाचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स स्पेशल

या घटनेची माहिती तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अपघातातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी रस्त्यावरून बाजूला करून टोचन (क्रेन) च्या साहाय्याने पोलीस ठाण्यात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. ​सदर मांस नेमके कसले आहे? हे मांस कोठून कोठे नेले जात होते? आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा सविस्तर तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे महामार्गावरील अवैध मांस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg