loader
Breaking News
Breaking News
Foto

आम. विक्रांत पाटील ग्रीन अंबेसिडर अवार्डने सन्मानित

पनवेल :- आम. विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथील हॉटेल अतिथी येथे राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग (महाराष्ट्र प्रदेश) आयोजित “संवाद २०२६” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आम. पाटील यांनी समाजातील विविध स्तरांतील नागरिकांशी थेट संवाद साधला. समाजातील प्रश्न लोकप्रतिनिधींपर्यंत थेट पोहोचावेत आणि त्यांच्या समाधानासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी आयोगाच्या वतीने ग्रीन अंबेसिडर अवार्ड (Green Ambassador Award)ने आम. विक्रांत पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आम. पाटील यांनी, हा सन्मान माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असून, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि जनहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग (महाराष्ट्र प्रदेश) चे जितेंद्र काटकर, नितेश मुळे आणि इंद्रजित गोंड, तसेच कामोठे येथील भाजपाचे तसेच आमदार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg