loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी केळ्ये मजगावचे पंच अरुण पवार ज्येष्ठ पंच म्हणून उद्या कबड्डी दिनी सन्मानित होणार, कबड्डी प्रेमींमधून आनंद

रत्नागिरी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने ज्येष्ठ पंच म्हणून कामगिरी बजावणारे श्री. अरुण पवार यांच्या कामगिरीची दखल घेवून २६ व्या कबड्डी दिनानिमित्त उद्या १५ जुलै रोजी त्यांना ज्येष्ठ पंच म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवरी वि.दा. सावरकर नाटयगृह, मारुती मंदिर रत्नागिरी येथे २६ वा कबड्डी दिन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अरुण पवार हे केळ्ये मजगाव गावचे असून त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. दाणपट्टा, कुस्ती, मल्लखांब, व्हॉलीबॉल अशा राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. कबड्डीमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. १९७४ मध्ये झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या खेळाडू कोट्यातून त्यांची भरती झाली. त्यानंतर २०२० मध्ये ते निवृत्त झाले. एसटी मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेची फायनल सतत ३ वर्ष त्यांनी जिंकली. व्यवसायीक संघ एसटी, खाजगी झुंजार रत्नागिरी या संघातून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांतून कबड्डी पंच म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. गावाचा भीमशक्ती केळ्ये संघ तयार केला.

टाईम्स स्पेशल

उद्या १५ जुलै रोजी २६ व्या कबड्डी दिनी अरुण पवार यांना ज्येष्ठ पंच हा पुरस्कार देवून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे कबड्डी प्रेमींमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg