loader
Breaking News
Breaking News
Foto

रायसोनी फॉउंडेशन जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन मार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धा २०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धेकारिता रायसोनी स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी प्रयोजकत्व दिले होते. सदरचे प्रयोजकत्व मिळण्याकरिता महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष अरुण लखानी ह्यांची मोलाची मदत झाली. रत्नागिरी जिल्हा असोसिएशन मार्फत रायसोनी फॉउंडेशन आणि अरुण लखानी ह्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच उत्तम दर्जेदार बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध केल्याबद्दल सर्वंकश विद्यामंदिर चे देखील आभार मानण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील सुमारे १३० खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा सर्वंकश विद्यामंदिर येथील बॅडमिंटन संकुलामध्ये आयोजित केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमध्ये खालीलप्रमाणे विजयी मुली एकेरी (अंडर १९)- विजयी नेहा मुळ्ये, उपविजयी अस्मी झोपे मुले एकेरी (अंडर १९) विजयी यश भोंगळे, उपविजयी आर्यन वेल्हाळ, मुली एकेरी (अंडर १७) विजयी विश्वा गामरे, उपविजयी अस्मी झोपे, मुले एकेरी (अंडर १७) विजयी सुमेध सुर्वे, उपविजयी आर्यन वेल्हाळ, मुलांचे दुहेरी (अंडर १५) विजयी आदित घाणेकर- जितेश वेसवीकर, उपविजयी पार्थ आपटे-प्रत्युष पेठे, मुली एकेरी (अंडर १५) विजयी रिया पेडामकर, उपविजयी विश्वा गामरे, मुले एकेरी (अंडर १५) विजयी जितेश वेसवीकर, उपविजयी अंश ढेकणे, मुली एकेरी (अंडर १३) विजयी विश्वा गामरे, उपविजयी वल्लरी देवस्थळी, मुले एकेरी (अंडर १३) विजयी अभिराज पवार, उपविजयी लविन चोचे, मुले एकेरी (अंडर११) विजयी लविन चोचे, उपविजयी अभिराज पवार, मुले एकेरी (अंडर ९) विजयी अभिराज पवार, उपविजयी रुत्विज बरसकर, पुरुष दुहेरी (एमडी) विजयी सुमेध सुर्वे-यश भोंगळे, सुधीर चैनुरू-विनीत पाटील, महिला एकेरी (डब्लू एस) विजयी नेहा मुळ्ये, उपविजयी ऐश्वर्या मोहिते, पुरुष एकेरी (एमएस) विजयी यश भोंगले, उपविजयी सुमेध सुर्वे आदी विजेते ठरले.

टाईम्स स्पेशल

ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे उपाध्यक्ष ओंकार हजारे, वस्तू व सेवा कर कमिशनर विकास पोवार साहेब, अमित मुळ्ये, सरोज सावंत, राजेश आराध्यमठ, मंगेश प्रभुदेसाई, रजनीश महागावकर, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या स्पर्धेच्या निकालांवरून रत्नागिरी जिल्हा संघांची निवड केली जाणार आहे. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, चषक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg