सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी जिमखाना मैदानावर सर्व प्रकारचे खेळ खेळले जावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व प्रकारच्या खेळाडूंना संधी मिळेल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित 'पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक' स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या स्पर्धेत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ आणि चित्रकला स्पर्धांचा समावेश होता.
यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, सावंतवाडी संस्थानचे अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी आपल्या अवघ्या तेरा वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण, खेळ, वाचन मंदिर, शेती अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या लोककल्याणकारी कारभारामुळेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांच्या राज्याचा गौरव 'रामराज्य' असा केला होता. नगरपरिषदेच्या माध्यमातूनही विविध पातळ्यांवर असेच दर्जेदार काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच जिमखाना मैदानावर खेळाडूंच्या विकासासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सर्व प्रकारचे खेळ चांगल्या पद्धतीने खेळता यावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी आपल्या भाषणात, श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला सर्वांनी उत्तम साथ दिली आणि विद्यार्थ्यांनी खेळातून आपले यश संपादन केले, बद्दल सर्वांचे आभार मानले. तर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी आढावा घेतला. गजानन परब यांनी सुत्रसंचलन केले. या सोहळ्याला पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, शर्वरी धारगळकर, प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, नगरसेवक निलम नाईक, दुलारी रांगणेकर, स्नेहा नाईक, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, सुकन्या टोपले आदी मान्यवर उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.