संगलट (खेड)(प्रतिनिधी)ः दापोली तालुक्यामध्ये चार जुलै ते १० जुलै या कालावधीमध्ये चार पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाल्यामुळे महिला आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने एन.के.वराडकर महाविद्यालय दापोलीच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी १३ जुलै रोजी दापोली पोलीस स्थानक आणि दापोली एसटी आगार प्रमुख यांच्याकडे कठोर कारवाई आणि त्या विकृत मनोवृत्तीच्या वाहकाच्या बडतर्फीची मागणी केली.
यावेळी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सर्व आरोपींना भर चौकामध्ये पोलिसांनी चाबकाचे फटके मारावेत अशी आग्रही मागणी केली. तसेच डिसेंबर महिन्यात हर्णे येथील एका ७२ वर्षीय वृद्धाने एका पंचवीस वर्षीय दिव्यांग युवतीवर बलात्कार केला. त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे दापोली पोलीस निरीक्षक यांचेकडे केली. दापोली तालुक्यातील महिला आणि प्रामुख्याने युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बलात्कार आणि छेडछाडीचा घटनांमुळे सुरक्षिततेचे वातावरण असून आम्हाला संरक्षण द्या अशी कळकळीची आग्रही विनंती महाविद्यालयीन युवतींनी केली.
या वेळी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे समन्वयक डॉ.प्रा. स्कंधा खेडेकर, प्रा. प्राजक्ता शिगवण मॅडम, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, योगेश साटम, मुग्धा सरदेसाई, जोग, मंडलिक यांच्यासह नागरिक आणि मोठ्या संख्येने एन. के. वराडकर आणि बेलोसे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.