दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल १० जुलै रोजी दापोली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधपासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा काल १० जुलै रोजी रात्री उशीरा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी संशयित निखील पांडुरंग चोगले (वय २७, रा. पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, जानेवारी २०२६ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत संशयिताने आपल्या राहत्या घरी अल्पवयीन पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बएनएस) २०२३ मधील कलम ६४, ६५(२), पोस्को कायद्याचे कलम ४(२), ६, ८ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.
जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा पोस्को गुन्हा आहे. यापूर्वी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात चार दिवसांच्या कालावधीत तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. दापोलीसारख्या शांत, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणासाठी ओळखल्या जाणार्या तालुक्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, शाळा-महाविद्यालयांत जनजागृती, पालकांचे समुपदेशन आणि दोषींवर जलद व कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.