loader
Breaking News
Breaking News
Foto

स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेची नगराध्यक्ष कृपा घाग यांना सदिच्छा भेट

दापोली - जिल्हा रत्नागिरी येथील दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष कृपाताई घाग यांना स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे शिष्टमंडळ भेटले. दापोली शहरात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे डॉक्टर आंबेडकर यांचे वडील मेजर सुभेदार रामजी सकपाळ सैन्यातून महू (मध्य प्रदेश) येथे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब दापोली येथील कॅम्प येथे वास्तव्यास होते. बाळ भिमराव येथील शाळेत (बिगारी) जात होते. याच शहरा जवळ वंदन हे रमाई आंबेडकर यांचे जन्मगाव आहे. या ऐतिहासिक बाबीमुळे दापोली शहरातील आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री भूषण रमाई आंबेडकर यांचे संयुक्त पुतळे उभारून त्यांच्या चिरंतन स्मृती जपण्याची मागणी दिनांक ०८ फेब्रुवारी २०१८ पासून स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सततच्या पाठपुराव्यामुळेच दापोली नगरपंचायतीच्या डॉक्टर आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांचे संयुक्त पुतळे उभारण्याकरिता दापोली नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात आला. परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे पुतळे उभारण्यात आले नाही. तातडीने दोन्ही पुतळे उभारण्यात यावे यासाठी दिनांक 4 जुलै 2026 रोजी नगराध्यक्ष दापोली नगरपंचायत यांना स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे संस्थाध्यक्ष राजकुमार वंजारी कोकण विभागातीचे संघटक गौतम मोरे, वणंद येथील दीपक धोत्रे, दापोली येथील सागर मोरे शिष्टमंडळात उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg