रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात दि. ३० जून रोजी दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पोवार, मुख्याधिकारी वैभव गारवे तसेच प्रमुख मार्गदर्शक राकेश सतवे उपस्थित होते. तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतो, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रमुख मार्गदर्शक राकेश सतवे यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर नियोजन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. पालकांनीही रत्नागिरी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.