loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळा कोसळली; दोन वर्षांपासून नवीन इमारतीची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

खेड (दिलीप देवळेकर) : खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत सोमवारी रात्री मुसळधार पावसादरम्यान कोसळली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी शाळा बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीच या शाळेच्या इमारतीचा पाया ढासळला होता. त्यावेळी इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतरही नवीन शाळा उभारण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी, गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग गावातील एका सोसायटीच्या कार्यालयात भरवले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेतील शिक्षकांच्या माहितीनुसार, नवीन शाळा इमारतीसाठीचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. अखेर सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात या शाळेची एक खोली कोसळल्याने प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी शासनाने नवीन शाळा इमारतीला तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg