खेड - खेड तालुक्यातील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे दिनांक १९ जुलै २०२६ रोजी संस्थेचा १० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरु केलेल्या प्लेग्रुप, नर्सरी, के.जी., पाळणाघर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे आज एका नामांकित प्रशालेमध्ये रुपांतर झाले आहे. आज या संस्थेने यशाची एकूण १० वर्ष पूर्ण करून ११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने प्रशालेमध्ये सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व पालक - शिक्षक संघाचे सदस्य, पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी सर्व पालकांनी संस्थेला व प्रशालेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
९ वर्षांपूर्वी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज एका विस्तीर्ण वटवृक्षात रूपांतर होत आहे. शैक्षणिक गुणवत्ता टिकवत विविध प्रकारची यशस्वी वाटचाल करून संस्थेची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रगती होत आहे. यामध्ये शिक्षकांचे, पालकांचे, संस्था चालकांचे महत्वाचे योगदान आहे. तसेच नव्याने सुरु केलेल्या (JEE,NEET, CET) अभ्यासक्रमामध्येही संस्थेने विशेष प्रगती केली आहे. प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये शैक्षणिक व भावनिक आत्मीयता निर्माण झाली आहे. यावेळी अरहान वागळे, इलाफ बडे, प्रणाली गायकर, नारायणी गीते, ओवी जाधव, मंजिरी चांदणे, आयुष खोपडे, परिधी गुप्ता, मृण्मयी बाभल, शार्विल वाघ, आर्वी खेडेकर, आयेशा वागळे, ओम कदम, मंथन निकम, सार्थक डोईफोडे, ओम जाधव या विद्यार्थ्यांनी वर्धापन दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन, उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस.एस. अली, सीईओ. विजय रॉबर्ट, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नलिनी नाईक यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.