रत्नागिरी : नियतीने अचानक घातलेला घाला आणि त्यानंतर समोर उभा राहिलेला मृत्यूचा अंधार... अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा एखादा माणूस देवदूतासारखा पाठीशी उभा राहतो आणि जीवन पुन्हा एकदा हसू लागतं. असाच काहीसा प्रत्यय कोल्हापूर येथील ’विंग्स’ रुग्णालयात आला आहे. एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष पावसकर यांच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. मात्र, कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा साडेतीन लाख रुपयांचा मोठा खर्च यामुळे पावसकर कुटुंबीय प्रचंड हतबल झाले होते. अशा संकटसमयी भाजपचे नेते आमदार रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आणि ’रत्नागिरीकरांचे संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे अनिकेत पटवर्धन धावून आले आणि त्यांनी या कुटुंबाला एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पावसकर यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या िविंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन, औषधोपचार आणि इतर वैद्यकीय बाबी मिळून साधारण साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च येणार होता. संतोष यांचे नातेवाईक तेजस पावसकर आणि संपूर्ण कुटुंब या मोठ्या रक्कमेची जुळवाजुळव कशी करायची, या विवंचनेत होते. पैशांअभावी शस्त्रक्रिया रखडते की काय, अशी भीती निर्माण झाली होती आणि कुटुंबासमोर अनेक अडचणींचे डोंगर उभे ठाकले होते. ही गंभीर परिस्थिती आणि पावसकर कुटुंबाची हतबलता रत्नागिरीचे सुपुत्र अनिकेत पटवर्धन यांच्या कानावर आली. काम कोणतेही असो, समोरच्याला मदत करायची म्हणजे करायचीच हा आपला बाणा जपत, अनिकेत पटवर्धन यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट रुग्णालयाशी आणि कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत मिळवून दिली. त्यांच्या या तत्परतेमुळे संतोष पावसकर यांच्या मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली.
अनिकेत पटवर्धन यांनी ऐन संकटाच्या वेळी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे एका रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. पावसकर कुटुंब आज अत्यंत भावूक झाले असून, त्यांनी अनिकेत पटवर्धन यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनिकेत भाऊ आमच्यासाठी ऐन संकटाच्या वेळी खरोखरच ’संकटमोचक’ म्हणून धावून आले. त्यांच्या रूपात जणू देवच आमच्या मदतीला आला, अशा शब्दांत कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय जबाबदार्या सांभाळत असतानाही सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचं उत्तम उदाहरण अनिकेत पटवर्धन यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा समाजासमोर ठेवलं आहे. त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.