माऊली महिला मंडळ, शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर व माऊली मतिमंद निवासी विद्यालयात दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, समाजकल्याण अधिकारी कांबळे तसेच जिल्हा सक्षमीकरण अधिकारी गुरुराज परीट यांनी विद्यालयाला भेट देऊन गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले तसेच उपस्थित अधिकार्यांनीही इतर विद्यार्थ्यांना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई गायकवाड उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करत भविष्यातही संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सतीश उकरंडे यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.