मालवण (प्रतिनिधी) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिला तालुका समन्वयकपदी पूजा करलकर, तालुका सह समन्वयकपदी माधुरी जावकर, उपतालुका संघटकपदी रश्मी परुळेकर, शहर संघटकपदी राधिका मोंडकर, मालवण उपशहर संघटकपदी गौरी मयेकर, योगिता गावकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपूटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त झालेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पक्षसंघटना अधिक बळकट करणे, महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे, जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात पक्षवाढ, संघटन मजबुती, जनसेवा, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितिन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, महेंद्र म्हाडगुत, महेश जावकर, उमेश चव्हाण, तृप्ती मयेकर, अनिता गिरकर, योगेंद्र गावकर, निलेश दुदवडकर, रवी तळाशीलकर, रवी मिटकर, अन्वय प्रभू, राका रोगे, ॲड. सुमित जाधव, सुशील तारी, बंड्या सरमळकर, गणपत आडिवरेकर, तपस्वी मयेकर, राजा शंकरदास, मनोज मोंडकर, किशोर गावकर, पॉली गिरकर, किरण चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, वासुदेव गावकर, सुप्रिया मडये, सुरेश मडये आदी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.