loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड जड्याळ वाडी रस्ते कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट; प्रशासनाच्या कारभारावर समाजसेवक मंगेश मोरे यांचा संताप

खेड(प्रतिनिधी)-खेडमधील जड्याळ वाडी परिसरात सध्या नगरपालिकेतर्फे रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक समाजसेवक मंगेश मोरे यांनी केला आहे. रस्त्याच्या बांधकामात आवश्यक असणारी वाळू न वापरता, केवळ खडीच्या भरवशावर कामे उरकली जात आहेत. जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कामांमधील अनियमिततेबाबत मंगेश मोरे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांना एक कळकळीची विनंती केली आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात सुरू असलेल्या अशा कामांवर तात्काळ अंकुश लावावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ दिखाव्यासाठी केली जाणारी ही कामे लवकरच निकामी होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना समाजसेवक मंगेश मोरे म्हणाले, प्रशासनाने आमच्या लोकांच्या पैशाचा असा खेळ मांडू नये. हे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. जर हे काम आता सुधारले नाही किंवा यावर कडक कारवाई झाली नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या प्रकरणाची सखोल तक्रार करणार आहोत. आम्ही जनतेचा आवाज उठवण्यासाठी गप्प बसणार नाही, असे पत्रकारांना मंगेश मोरे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg