loader
Breaking News
Breaking News
Foto

दोन दिवसात तालुक्यातील भूमिगत केबलमुळे झालेले खड्डे भरले नाहीत तर त्याच खड्यात अधिकारी यांना टाकणार - सभापती प्रणव पोळेकर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील जि. प. शाळा अडूर क्रमांक १ समोरील मुख्य रस्त्यावर भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यावर पडलेला मोठा चर तसाच खुला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज या रस्त्यावरून शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. खोल चरामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून विशेषतः पावसाळ्यात हा धोका अधिक गंभीर बनला आहे. पावसाचे पाणी साचल्याने चराची खोली लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वार आणि पादचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने हा चर भरून रस्ता पूर्ववत करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच तालुक्यात अन्य ठिकाणी भूमिगत केबलमुळे पडलेले खड्डे हा एक चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिवसात जर तालुक्यातील भूमिगत केबल मुळे झालेले खड्डे भरले गेले नाही तर त्याच खड्ड्यात अधिकार्‍यांना टाकणार अशी सम्तप्त प्रतिक्रिया सभापती प्रणव पोळेकर यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg