loader
Breaking News
Breaking News
Foto

'सावधान, यमदूत आपली वाट बघत आहे..!'; दोडामार्ग–तिलारी रस्त्यावर काँग्रेसचा अनोखा फलक, सर्वत्र चर्चा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग–तिलारी मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील कथित त्रुटींवर बोट ठेवत दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. "सावधान, यमदूत आपली वाट बघत आहे..!" अशा आशयाचा फलक उभारून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या फलकाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. या फलकातून ठेकेदार, पोटठेकेदार तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या कामकाजावर उपरोधिक शब्दांत टीका करण्यात आली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोडामार्ग–तिलारी मार्ग चिखलमय व धोकादायक बनल्याचा आरोप फलकावर करण्यात आला असून, नागरिकांनी "जीव मुठीत धरून प्रवास करावा" असा इशाराही देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, "पावसाळी डांबर वापरून रस्ता निर्धोक बनवण्याची बुद्धी संबंधित ठेकेदार, पोटठेकेदार व MSRDC यांना देवो," अशा उपरोधिक शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी, "आम्ही आपल्या सुरक्षित प्रवासासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो," असा उल्लेख करत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दोडामार्ग–तिलारी मार्गावरील रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचणे, घसरडा पृष्ठभाग तयार होणे आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणे, अशा तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उभारलेला हा फलक सध्या चर्चेचा विषय ठरला असून, संबंधित यंत्रणांनी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg