loader
Breaking News
Breaking News
Foto

देवाची आठवण प्रत्येक क्षणी करा; माजी आमदार दयानंद सोपटे

सावंतवाडी: आज माझ्याकडे जे काय आहे ते देवाने मला दिले आहे. देव जेव्हा आपणाला देतो तेव्हा देवाची आठवण आपण प्रत्येक क्षणी करणे गरजेचे आहे. त्याची भक्ती भावाने सेवा करणे हे आपले कर्तव्य असून ती आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी खानोली सुरंगपाणी येथे केले. विठ्ठल रखुमाई पंचायतन खानोली सुरुंगपाणी येथे शनिवारी या पंचायतनचे प्रमुख दादा पंडित यांचा ७४ वा वाढदिवस त्यांचे भक्त, हितचिंतक, मित्र मंडळ व परिवार यांनी साजरा केला. यावेळी दयानंद सोपटे बोलत होते. दादा पंडित यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दादा व त्यांच्या पत्नीला औक्षण करून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोपटे पुढे म्हणाले, या विठ्ठल व दत्त मंदिरात मी सहा महिन्यापूर्वी आलो. येथील धार्मिक वातावरण पाहून मला समाधान लाभले. येथे देवाचे दर्शन घेता घेता मला दादांचेही आशीर्वाद मिळाले. त्यांच्याकडून अनेक वेळा मला मार्गदर्शन लाभले. दादांनी शून्यातून या मंदिरांची निर्मिती केली. माझी देवावर श्रद्धा आहे. काही दिवसापूर्वी मला दादांचा वाढदिवस असल्याचे समजले. तेव्हाच मी ठरवले की, कितीही शेड्युल बिझी असले तरी वाढदिवसाला येणारच. आज मला दत्तगुरु महाराज, विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन घेता आले. त्याचबरोबर दादांचे आशीर्वाद मिळाले. हे मी माझे भाग्य समजतो. असे सोपटे म्हणाले.

टाईम्स स्पेशल

यावेळी मार्गदर्शन करताना दादा पंडित म्हणाले, आपली वाणी ही गोड असावी. माझ्या जीवनाचे घोषवाक्य आहे की अभद्र वाणी कोणाचीच असू नये. पवित्र वाणीने जग जिंकता येते. सर्व धर्माची शिकवण एकच आहे. प्रत्येक धर्मातील माणसाने आपल्या धर्माप्रमाणे वागावे. हिंदूंनी आपली हिंदू संस्कृती जपावी. आज मला ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची सेवा करण्याची बळ ईश्वराने मला द्यावे असे मागणी मी ईश्वरचरणी करतो. तुम्हा सर्वांना चांगले आयुष्य लाभो, तुमच्या जीवनात सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो. असे दादा पंडित यावेळी म्हणाले. यानंतर माजी आमदार दयानंद सोपटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आयोजकांनी सन्मान केला. आंजनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg