loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड चे सुपुत्र दीपक हंबीर यांचा प्रशंसापत्राने सन्मान

खेड : तालुक्यातील कळंबणी गावचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील देवनार पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत दीपक आत्माराम हंबीर यांना प्रशंसापत्राने सन्मानित करण्यात आले. ५५ हजार रुपये किंमतीचा मेफेडॉन हा अमली पदार्थ विक्री करताना एका इसमास सापळा रचून गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली होती. याशिवाय त्याच्या साथीदारालाही शिताफीने अटक केले होते. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबई-चेंबूर परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या हस्ते प्रशंसापत्राने त्यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वीही त्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg