loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरातील विश्वास खरे खून प्रकरणाचा १२ वर्षांनी निकाल, दोघांना जन्मठेप

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : ऑक्टोबर 2014 मध्ये खून झालेल्या विश्र्वास खरे यांच्या खटल्याचा निकाल 12 वर्षांनंतर लागला. Crime News चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.डी. बी. म्हालटकर चिपळूण येथे महिनाभरापूर्वीच रुजू झाले. त्यांनी १२ वर्षे प्रलंबित केसची सुनावणी 12 दिवसांत पूर्ण केली. आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे व किरण रामदास कुचेकर या दोघांना जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरी अशी शिक्षा ठोठावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर वरचापाट येथील विश्वास महादेव खरे यांचा ०१ ऑक्टोबर २०१४ रोजी खरे प्लेझर पॉईंट या होमस्टे येथे दोन पर्यटक आले होते. विश्र्वास खरे यांच्या गळ्यातील 10 तोळ्याची सोनसाखळी चोरण्याचा त्यांचा डाव होता. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी विश्र्वास खरे आपल्या होम स्टेमधील स्वयंपाकघरात काम करत असताना या दोघांनी क्रूरपणे विळा व सूरा याने विश्र्वास खरे यांचा गळा, पोट, हात यावर २१ गंभीर इजा केल्या. सोनसाखळी चोरुन तेथून पोबारा केला. दुपारी 1.00 च्या दरम्यान ही घटना घडल्याचे लक्षात आले.

टाईम्स स्पेशल

चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. डी. बी. म्हालटकर हे चिपळूण येथे महिनाभरापूर्वीच रुजू झाले. त्यांनी 12 वर्ष प्रलंबित असलेली ही केस जलदगतीने सोडविण्याचा निर्णय घेतला. सुमारे 12 दिवसांत सदरच्या केसमध्ये दोन्ही वकिलांचा सलग युक्तिवाद त्यांनी ऐकला. आणि केस निकाली काढली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg