loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगाव विद्या विहारमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल प्रशालेत शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून,सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून म्हापसा गोवा गव्हर्मेंट आयटीआयचे प्राचार्य सुभाष रेडकर तसेच शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये, केंद्रप्रमुख कोकितकर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गजानन काकतकर, प्रसाद सांगुडकर, प्रशांत सावंत, माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर, शिक्षक पालक उपाध्यक्ष सानिका तिरोडकर, शिक्षक पालक सहसचिव हेमंत आडारकर, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष दिनानाथ काळोजी, मोहन पांढरे, डीएड कॉलेज चे मारुती कांबळे, तुंगार, प्रसाद मेस्त्री, बाळकृष्ण हळदणकर, प्रमोद पांढरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी म्हापसा गोवा गव्हर्मेंट आयटीआय चे प्राचार्य सुभाष रेडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सिंधुदुर्गातील शाळा म्हणजे खरोखरच संस्कृतीची खाण आहे.या शाळांमधील शिस्त,आपुलकीपणा ,शाळेबद्दल आदरभाव आणि विद्यार्थी - पालक यांची शाळेबद्दल असणारी तळमळ खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.आपणही इतकी संस्कृती,इकडचे आचार - विचार आपल्या गोव्यातील शाळांमध्ये आचरणात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगत, आपणास शाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलावल्या बद्दल शिक्षक,ग्रामस्थ यांचे आभार मानले तसेच व विद्यार्थ्यांनी परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी शाळेच्या आजी माजी विद्यार्थी,ग्रामस्थांचे कौतुक करून, विद्यार्थ्यांसाठी बक्षिस रुपात मदत तसेच प्रशालेला मदत केलेल्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्या साळवी व आभार प्रदर्शन मानसी परुळेकर यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि आजी - माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg