loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली-खेड मार्गावरील टाळसुरे ग्रामदेवता मानाईदेवी मंदिरासमोर रस्त्यावर मधोमध झाड पडले; काही काळ वाहतूक खोळंबली

दापोली (प्रतिनिधी) : वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या दापोली-खेड मार्गावर टाळसुरे गावाच्या हद्दीत श्री मानाईदेवी मंदिरासमोर रस्त्याच्या मधोमध एक भलेमोठे झाड कोसळून आडवे पडले त्यामुळे या मार्गावरील सर्वप्रकारची वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र स्थानिक टाळसुरे येथील ग्रामस्थांनी भर पावसात भिजत मदतकार्य करत रस्त्यावर पडलेले झाड रस्त्यावरुन हटवल्याने खोळंबलेली वाहतूक पुर्ववत सुरू झाली. दापोली आणि खेड या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा दापोली खेड नावाचा रस्ता आहे. या महत्त्वाच्या मार्गावरुनच दापोली येथून खेडमार्गे पूणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच चिपळूण संगमेश्वर मार्गे रत्नागिरी तसेच गोव्याकडे जाता येते. अशा या मार्गावर शुक्रवारी शेंबड जातीचे एक भलेमोठे झाड रस्त्याच्या अगदी मधोमध कोसळून खाली आडवे पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीत सध्या पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे सदरचे झाड भर पावसात काम करुन हटवणे तसे मेहनतीचेच होते. मात्र या मार्गावरून सतत सुरू असलेली वाहनांची वर्दळ आणि एकुणच या मार्गाचे महत्त्व लक्षात घेत टाळसुरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी तसेच या वाहतूक कोंडीत अडकलेल्या सर्वांनीच लोकहितासाठीचे सामाजिक काम म्हणून अगदी भर पावसात भिजत रस्त्यावर पडलेले झाड रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मोठी मदत केली. त्यामुळे दापोली आणि खेड बाजूकडील लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगांचा मार्ग एकदाचा मोकळा झाला आणि खोळंबलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

टाईम्स स्पेशल

रस्त्यातील झाड हटविण्याच्या महत्वाच्या कामात टाळसुरे येथील अनिल लाले, अजित लवाटे, सरपंच पूर्वा संदिप सकपाळ, तसेच टाळसुरे येथील स्थानिकांनी मेहनत घेतलीच शिवाय आपटी येथील बंटी गायकवाड आणि या वाहतुक कोंडीत अडकलेला निहाल हा देवदुतासारखा उपयोगी पडला त्यांनी त्याच्या सोबत आणलेल्या कटरमुळेच झाड कापून हटविण्यात मोठी मदत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg