रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील भावेश सुरेश चव्हाण याने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'Re-NEET UG 2026' परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात एसटी प्रवर्गातून प्रथम, तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आयोजित या परीक्षेत त्याने ७२० पैकी ६६६ गुण मिळवत ९९.९६६८९८३ पर्सेंटाइल मिळवले. विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत भावेशने हे यश मिळवले आहे. त्याची आई सुरेखा चव्हाण या रत्नागिरी येथील विद्युत निरीक्षक कार्यालयात गेली १५ वर्षे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. नुकतीच त्यांची ठाणे-२ कार्यालयात बदली झाली आहे. तर वडील सुरेश चव्हाण हे रत्नागिरी एक्सप्रेस दैनिकात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. साध्या कुटुंबातील मुलाने मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे.
भावेशचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यात झाले. सहावी ते दहावीपर्यंत तो राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवासी विद्यार्थी होता. दहावीच्या परीक्षेतही त्याने विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. यानंतर अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी त्याने लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयाचे संचालक बी. ए. मैंदर्गे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव, अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले.
भावेशच्या या यशाबद्दल शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव बी. बी. ठोंबरे, प्राचार्या वीणा कोपकर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलाने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भावेशच्या भावी वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.